आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

देर आये दुरुस्त आये

 एसटी महामंडळाचे शासनात विलीकरण व्हावे यासाठी काही एसटी कर्मचारी दोन महिन्यांपासून अजूनही आंदोलन करत आहेत.आता हा लढा थेट न्यायालयात गेला आहे.एसटी कर्मचारी फार मोठ्या आर्थिक विवंचनेत होते त्यासाठी शासनाने भरघोस पगारवाढ देऊनही काही आंदोलक विलीकरणाशिवाय मागे हटणार नाही असे सांगून गुणरत्ने सदावर्ते या वकिलाच्या वेशातील नेत्याच्या आदेशानुसार मागे हटायला तयार नाहीत.गुणरत्ने सदावर्ते हे या आंदोलकाचे मार्गदर्शक असले तरी त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना हा तिढा सोडवायचा नाही तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर तोंडसुख घेण्यातच ते समाधान मानत आहेत.आपल्या वकिलीचा गैरफायदा घेऊन एसटी कर्मचाऱ्याची स्थिती गिरणी कामगारासारखी होण्याला सदावर्ते जबाबदार असतील असे म्हटल्यास चूक ठरू नये.त्याचा प्रमुख राग हा शरद पवार यांच्यावरच आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून त्यानीच याचकाकर्त्याची वकिली घेतली.या आंदोलनात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण त्याचेच हात पोळले गेले.सदावर्ते हे आघाडी सरकारविरुद्ध रोष उत्पन्न करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना उत्तेजन देत आहेत हे स्पष्ट होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब याच्याशी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेच्या नेत्यांची नुकतीच या विलीनीकरण मुद्यावर बैठक झाली.या बैठकीत सर्वांनीच गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांच्यामागे गेल्याची चूक झाली हे मान्य केले आणि वकील बदलण्याची ग्वाही दिली.वकील गुणरत्ने यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा नावाखाली राजकारणच जास्त केले.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्याचा बाबतीत देर आये दुरुस्त आये असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


-अरुण पां. खटावकर
लालबाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...