समाजाचे कल्याण व्हावे, समाजातील वेगवेगळ्या समस्या सुटाव्यात, प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोणातून समाजाच्या कल्याणासाठी समाजात आज अनेक व्यक्ती आहेत. त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका विश्वास गुरव.
प्रियांका विश्वास गुरव यांचा जन्म मुंबई येथे झाला.MA,B.ed असे त्यांचे शिक्षण असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी 8 वर्षे काम केले.5 वर्षे शिक्षक व 3 वर्षे रेक्टर म्हणून काम केले. आजपर्यंत अनेक विद्यार्थी प्रियांका मॅडम यांच्या हातून शिकून गेले व मोठे झाले. शाळेत असताना कोरोना काळात अनेक उपक्रम त्यांनी राबविले. कोरोना विषयक समाजात जनजागृती केली. सर्व मुलींना स्वच्छतेविषयी माहिती दिली. सॅनिटायजर, मास्क वापरणे, टेम्परेचर चेक करणे, ऑक्सिजन लेव्हल चेक करणे आदी माहिती प्रत्येकाला दिली. कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले. सकस आहार व मेडिसिन याची व्यवस्था केली. शिक्षकाची नोकरी करत करत त्यांनी आपले केकचा साईड बिझनेस सुद्धा सुरु ठेवला.पतीच्या निधना नंतर त्यांनी अनेक हालकष्ट सोसले. पण त्या हरल्या नाहीत.समाजात जनजागृती करण्याचे, समाजसेवा करण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच आहे. त्यांनी 13 वर्षे हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम सुद्धा केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. प्रियांका गुरव यांनी आपल्या समाजसेवेत कोणतेही खंड पडू दिले नाही. नेहमी समाजाच्या कल्याणासाठी ते झटत असतात. त्यामुळे समाजात त्यांना आदराचे स्थान आहे.दिनांक 23/1/2022 रोजी त्यांचा 42 वा वाढदिवस आहे.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा पुणे येथे सध्या त्या कार्यरत आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शब्दांकन -पत्रकार विठ्ठल ममताबादे, उरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा