आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

28 जानेवारी 2022 रोजी शिवा संघटनेचा 26 वा वर्धापन दिन उदगीरमध्ये ; वीरशैव लिंगायत समाजाचा भरणार भव्य मेळावा

उरण (विठ्ठल ममताबादे )- वीरशैव लिंगायत समाजाच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, वीरशैव लिंगायत समाजाचे देशातील सर्वात प्रभावी व आक्रमक समजल्या जाणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे शुक्रवार दि 28 जानेवारी 2022 रोजी 26 वे वर्धापन दिन आहे.हा वर्धापन दिन रघुकूल मंगल कार्यालय, नांदेड बिदर रोड, शिवाजी चौका जवळ, उदगीर,जिल्हा लातूर  येथे दुपारी 12:30 वाजता मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.

   वीरशैव लिंगायत समाजाची वज्रमूठ तयार करून समाजाला एकसंध बनवून समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यात तसेच वीरशैव लिंगायत समाजात अस्मिता, स्वाभिमान, एकसूत्रता निर्माण करण्यात देशात, महाराष्ट्र राज्यात शिवा संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. अश्या या शिवा संघटनेच्या 26 व्या वर्धापन दिनाला वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी, शिवा संघटनेच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.वर्धापन दिनाचे उदघाटन प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून गुरुवर्य शंभूलिंग शिवाचार्य महाराज हावगी स्वामी मठ, उदगीर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर मेळाव्याला पाणी पुरवठा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य संजय बनसोडे हे मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्याला तथा वर्धापन दिनाला वीरशैव लिंगायत समाजाचे शिवाचार्य, धर्मगुरू, शिवा संघटनेचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

     दरवर्षी शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून हजारो शिवा संघटनेचे कार्यकर्ते वर्धापन दिनाला हजर असतात. भारतात व भारता बाहेरही कुठेही वर्धापन दिन असला की तिथे शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर असतात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी, यंदा वर्धापन दिन उदगीरला असल्याने उदगीरला जाण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून वाहनांची सोय केली असून शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, शिवभक्तांनी शिवा संघटनेच्या खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.

   डोंबिवली विभाग -रुपेश होनराव -9892869039,ठाणे विभाग -शिवा बिराजदार -9820535330,पालघर जिल्हा - शान्तेश्वर गुमते 9623862285/8390908146, रायगड विभाग -नारायण कंकणवाडी -9594862000,रायगड विभाग -विनायक म्हमाने -9967544387,रायगड विभाग -विठ्ठल ममताबादे-9702751098,नवी मुंबई विभाग -देवेंद्र कोराळे -9869429210 यांच्याशी संपर्क साधावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...