मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये काम करत असताना मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी विशेष योगदान देणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार सोहळा गुरुवार दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयाच्या त्रिमुर्ती या मुख्य प्रांगणामध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या हया कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातील कक्ष अधिकारी श्री वैभव मोहन पाटील (नवी मुंबई) यांचादेखील सत्कार मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, सहसचिव श्री मिलिंद गवारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजना व उपक्रम आपल्या लेखांच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये श्री वैभव पाटील यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहीले आहे. आरोग्य विभागाचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेत ते गेल्या अनेक वर्षांपासुन नियमित लिखाण करत आहेत. दै नवे शहर मध्ये प्रसारीत झालेल्या आरोग्यविषयक योजनांच्या लेखमालिकेचे ‘’आरोग्यमंथन’’ हे त्यांचे पुस्तकदेखील आरोग्य विभागाच्या आरोग्य, माहिती, शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रातील विविध नामांकित मराठी वृत्तपत्रांमध्ये ते सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व आरोग्याच्या विषयावर लिखाण करत असतात. मराठी भाषा संवर्धन दिनाच्या पार्श्वभुमीवर त्यांचा मराठी भाषेच्या प्रसारातील योगदानासाठी शासन स्तरावर झालेला सन्मान कौतुकास्पद असुन विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी त्याबददल त्यांचे अभिनंदन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा