आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

भाजपा युवा मोर्चा व समर्पण ब्लड बँक आयोजित रक्तदान शिबीर

मुंबई : कांजूरमार्ग येथील भाजपा युवा मोर्चा व समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 22 जानेवारी 2022 रोजी कांजूरमार्ग व्हिलेज रोड, जस्मिन सुपरमार्केट, इंदिरा नगर याठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समर्पण ब्लड बँक मागील 13 वर्षापासून थेलेसिमिया असा आजार जो जन्मताच मनुष्याच्या शरीरात नवीन रक्त निर्माण प्रकीयाच होत नसते अशा 150 पेक्षा जास्त मुलांसाठी मोफत काम करते त्याच बरोबर इतर ज्यांना रक्ताची गरज असते त्यांना स्वतः दारात रक्त, प्लेटलेट उपलब्ध करून देतात.
     याकरिता  सामाजिक बांधिलकी म्हणून या  ब्लड बँकेबरोबर खारीचा वाटा उचलून स्वतः रक्तदान करून समाजाला रक्तदानासाठी जागरूक व प्रवृत्त  करण्याची आज  गरज आहे.
     तेव्हा रक्तदानासारख्या या महादानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन, रक्तदान करुन  या सामाजिक कार्यास  हातभार लावावा असे आवाहन आयोजक अमोल गंगाराम पोखरकर
(जिल्हा उपाध्यक्ष,युवा मोर्चा ईशान्य मुंबई )यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...