बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-तिळगुळ घ्या गोड गोड बोला,मकर संक्रांतीचा हा सण महिलावर्ग घराघरात व सार्वजनिक ठीकाणीही उत्साहात साजरा करत असतात.याच सणाचे औचित्य साधुन येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाने श्री अपार्टमेंट,अभिनव बॅकेच्यावर,गांधी चौक बदलापुर(पुर्व)येथील संपर्क कार्यालयात मंडळाच्या महिला सदस्यांचा उपस्थितीत हळदीकुंकु समारंभ उत्साहात साजरा केला.याप्रसंगी मंडळाच्या खजिनदार सौ.सुवर्णा कदम,सौ.प्रियांका पाताडे,सौ.भावना परब,सौ.अर्चना उतेकर,सौ.वैभवी परब,सौ.गंधाली तिरपणकर व इतर महिला उपस्थित होत्या.हळदकुंकु,सौभाग्य वाण,पुष व तिळगुळ देऊन हा हळदीकुंकु समारंभ रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाच्या महिला सदस्यांनी उत्साहात साजरा केला.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सेक्रेटरी मंगेश कदम,उपाध्यक्ष विजय परब,सुनिल सदडेकर,मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत,अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.कोविड १९च्या नियमानुसार हळदीकुंकु समारंभ मर्यादित स्वरूपातच आयोजित करण्यात आला होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा