आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

मनसे - रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शिष्टमंडळाच्या पनवेलमधील नामांकित कंपन्यांना भेटी



उरण (विठ्ठल ममताबादे )-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार  रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष  महेंद्र बैसाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पनवेल मधील काही ठराविक कंपन्यांना भेट देऊन त्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून उद्योजक घडविण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. ही भेट जिल्हासंघटक रामदास पाटील यांच्या माध्यमातून संपन्न झाली.  पनवेल येथील ओरीयन मॉल, रिलायन्स, डी मार्ट व जे डब्ल्यू सी इ. कंपनीचा समावेश होता. सदर शिष्टमंडळात अध्यक्षांसहित सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, संजय लोणकर, वैभव देशपांडे, उपाध्यक्ष संदीप ठाकूर, महिला चिटणीस सिद्धीताई आंगणे, सुरेखा महामुनी व स्थानिक पदाधिकारी समाविष्ट होते. विविध कंपन्यांना भेटी दिल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कितीतरी युवकांना याचा निश्चितच फायदा होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...