आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

नविन घर, जागा घेताना फसगत ; चौकशी करून घर खरेदी अथवा विक्री करावे

     " विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम राहत्या घरांवर झाला.घरे मिळणे दुरापास्त झाले. मुंबई वाढत - वाढत  डहाणू,कासरा,खोपोली,पनवेल पर्यंत पोहोचली. मुंबईतील जागांचे दर गगनाला भिडले.ठाणे,नवी मुंबई,वसई - विरार  ,पनवेल महानगरपालिका या क्षेत्रातही जागां शिल्लक नाहीत म्हणून लोक त्याही पुढे सरकू लागले.परवडणारे घरे येथे नाहीत. पैशाची जमवाजमव करून घर घेण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कुठल्या ना कुठल्या कारणाने फसले जातात. नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घर घ्यायचे म्हटले तरी विकास घर विकण्याचे काम खाजगी संस्था/ कंपनीला देतात.त्यामुळे अशा ठिकाणी घरे अधिक महागडी असतात.म्हाडा,   सिडको या सरकारी कंपण्यानी बांधलेली घरे तुलनेने स्वस्त असतात पण ती कोणत्याही नागरी सेवा सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी असतात. येथे घर घेतले तर यातनांना सामोरे जावे लागले. रेल्वे स्टेशन पासून लांब, शाळा,महाविद्यालय,रुग्णालय ,दवाखाने,भाजी मंडई जवळ पास नसते.वाहतूक व्यवस्था नसते .तरी गरजूंना पर्याय नसतो म्हणून येथील घरे शासनाच्या निर्देशानुसार विकली जातात. आता घरे घेणाऱ्यांची  संख्या मोठी असल्याने सोडत पद्धत वापरली जाते. येथे फसवणूक होत नाही. जुनी घरे विकत घेताना दलाच्या सुळसुळाटामुळे घरे महाग होतात. घर घेताना कोणाच्या आमिषाला बळी न पडता शांतपणे चौकशी करून मगच घर खरेदी अथवा विक्री करावे असे वाटते.  

         
  -  महादेव गोळवसकर 
    कल्याण पश्चिम. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...