आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

विवाह सोहळ्यातील डामडौल आवरा

   आजचे लग्न सोहळे थाटमाट,डोमडोल ,वेशभूषा,छायाचित्रण यांत गुंतले आहेत. आधीच ॠण काढून यजमान  विवाह सोहळा  करतात.मोठ्या प्रतिष्ठेसाठी साजेशी भोजन व्यवस्था. सोहळ्यातील डामडोल डोळ्यांची पारणे फेडणारा बघुन आमंञितही चकीत होतात.दबक्या आवाजात म्हणतात काळा पैसा बाहेर काढला.खूप खर्च केला यजमानांनी विवाह सोहळ्यात .उंची पोषाख,छायाचित्रण ,सभागृहातील सजावट नेञदिपक हे सारे रूबाबदार म्हणून की काय आलेल्या पाहुण्यांना नवरदेवाला/ वधुला आशिर्वाद देऊन निघण्याचा घाई असते पण नव वधु- वराचे लग्न लागल्यानंतर धार्मिक विधी व छायाचिञण  यात बराच वेळ फुकट जातो. येथे छायाचिञकार आपली मनमानी करून आपला धंदा कसा होईल याकडे लक्ष ठेवून असतो.पाहुणे कंटाळतात.धार्मिक विधी झाल्यावर वधु वर  वेशभूषा करण्यासाठी आपल्या खोलीत जातात त्यात बरेच तास खर्च होतात. पाहुण्यांना परत जाण्याची घाई असते ते नातेवाईकांच्या कडे विनवणी करतात की,वधु - वराला व्यासपीठावर  आणा .भेटायला वेळ होतो आहे. अखेर वधु - वर स्वागत समारंभाच्या व्यासपीठावर येतात तेव्हा भेटण्यासाठी झुंबड उडते.हा सर्व थाटमाट थांबवा आणि साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडा.जेणे करुन  आर्थिक भुर्दड पडणार नाही. पाहुण्यांना एकाच दिवशी चार - पाच लग्नात जाऊन  वधु वराला आशिर्वाद देऊन निघण्याचा बेत असतो. पण वेगवेगळ्या कारणांसाठी विलंब होतो.

        आजच्या आधुनिक युगात साधा विवाह दुर्मिळ होत आहे.विवाहातील होणारा खर्च वधु - वराच्या कल्याणा करिता राखून ठेवा.उच्च शिक्षित तरूण-तरूणी कोर्ट मेरॅजचा पर्याय निवडतात तो योग्य आहे. कोणत्याही डामडौल शिवाय विवाह करतात.अलिकडे एका महाराष्ट्र राज्याच्या मंञ्यांच्या मुलीने अशा प्रकारे विवाह केला याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. यातून वेळ,आर्थिक खर्च,भोजनावळी , पोशाख याची बचत होते.चांगला निर्णय आहे.असे बदल होणे अपेक्षित आहे. 
                               
-महादेव गोळवसकर 
 कल्याण पश्चिम.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...