उरण (विठ्ठल ममताबादे )-ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित, रामचंद्र म्हात्रे विद्यालय ऍण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ऍण्ड कॉमर्स आवरे, ता. – उरण, जि. – रायगड येथे १२ जानेवारी २०२२ रोजी “राष्ट्रीय युवा दिन” ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेघा म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची महती पटवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराजाची प्रेरणा देऊन ते उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, स्वामींचे आदर्श व्यक्तिमत्व, देशभक्ती अशा विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाची माहिती दिली.
प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी आवरे गावात जन्म घेवून प्रतिकुल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालये व तंत्र शिक्षण अशा क्षेत्रात अनेक शैक्षणिक उपक्रम निर्माण केले. या शैक्षणिक उपक्रमातून शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातुन स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थ्यांनी नावलौकिक संपादित केला आहे. प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या कार्याची प्रेरणा घेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण, कला, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करून सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे असे मौलिक विचार त्यांनी आपल्या भाषणातून दिले.
या प्रसंगी ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे, बांधकाम व्यावसायिक जमाल सिद्धिकी, नाट्य व सिने कलावंत सुयश म्हात्रे, तसेच कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद केणी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा