उरण (विठ्ठल ममताबादे )-बुधवार दि. १२/१/२०२२ रोजी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी येथे झालेल्या बैठकीमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन च्या अनुषंगाने दि. २४/१२/२०२१ रोजी जेएनपीटी चे उपाध्यक्ष श्री उन्मेष वाघ यांच्या समवेत माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शिष्टमंडळा बरोबर झालेल्या चर्चेअंती श्री उन्मेष वाघ , डेप्युटी चेअरमन, जेएनपीटी यांनी दिलेल्या सुचनेनुसार आज जेएनपीटी चे चीफ मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन श्री. ढवळे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोरे तसेच आर के एफ मॅनेजमेंट चे कायदेशीर सल्लागार यांच्या समवेत बैठक झाली.
पालक , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा होवून संस्थेच्या हस्तांतरणा बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारीत केलेले शासन निर्णयानुसार या पूर्वी जसे IES संस्थेने शासकीय नियमानुसार वेतना निश्चिती करून ज्या प्रमाणे वेतन व इतर सर्व भत्ते देऊ केलेले आहेत त्या प्रमाणे वेळोवेळी वेतनश्रेणी मध्ये शासकीय नियमानुसार होणा-या बदलासह पुर्वलक्षी प्रभावाने देण्याच्या अटीला अधिन राहून दिलेल्या समंती पत्राचे वाचन करुन हस्तांतरण करण्यास एक मताने आर के एफ संस्थेसह जेएनपीटी च्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. तसेच इतर सर्व विषय हस्तांतरण झाल्यावर प्राधान्याने करण्याचे मान्य केले.
या वेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक नेते नरसू पाटील, जेएनपीटी चे विश्वस्त काॅ. भूषण पाटील, विश्वस्त दिनेश पाटील, जि प सदस्य विजय भोईर, पं स सदस्य दिपक ठाकूर , उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, कामगार नेते संदिप पाटील सुरेश पाटील , पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण घरत, योगेश तांडेल तसेच मुख्याध्यापक रमाकांत गावंड , गिरीश पाटील, प्रमोद कांबळे ईतर शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा