कोकणवृत्त : भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे जनसामान्यांना कोरोना काळात योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता तसेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेतील विविध प्रकरणातील भ्रष्टाचार व गैरप्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता संस्थेच्या माध्यमातून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आली होती. संस्थेच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषणात सहभाग घेणारे संस्थेचे पदाधिकारी भूषण मांजरेकर, कृष्णा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष रीमा मेस्त्री, राजेश सातोसकर, सौरभ नागोळकर, आबा चिपकर, प्रविण भगत, अरुण कांबळी, व राजन रेडकर यांनी जनहितार्थ सलग १०० तास व २३० तास असे दोन वेळा कोरोना महामारीच्या काळात केलेल्या आमरण उपोषणा दरम्यान आपले शासकीय कर्तव्य व सामाजिक बांधिलकीचे भान याचा सुवर्ण मध्य साधत सिंधुदुर्गनगरी पो.ठाण्याचे तत्कालीन पो.नि. व सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे विद्यमान पो. नि. अमित यादव यांनी त्यांचे कर्तव्य सचोटी, चोख पणे बजावीत उपोषणकर्त्यांना जे सहकार्य केले ही त्यांची कर्तव्य दक्षता लक्षात घेता अशा पोलीस अधिकाऱ्यांची दखल घेवून त्यांचा कर्तव्याचा सन्मान करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याने भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी त्यांना "सतर्क पोलीस टाईम्स सन्मानचिन्ह" देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातील पोलिसांच्या कर्तव्याची माहिती देणारा सतर्क पोलीस टाईम्स चा सन २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाची प्रत त्यांना भेट म्हणून देण्यात आली. सदर वेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पो. हवा. लक्ष्मण काळे, संस्थेचे सह सचिव राजेश सातोसकर, प्रदीप रेडकर व श्रीम. प्राश्वी रेडकर हे उपस्थित होते.
जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पो.नि. अमित नाईक याचे जिल्हाध्यक्ष दाजी नाईक यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी पोलीस कर्तव्यास शुभेच्छा दिल्या. तसेच पो.नि. अमित यादव यांच्या या प्रामाणिक कर्तव्याची दखल घेण्याबाबत संस्थेच्या वतीने मा.गृहमंत्री ना.श्री.दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक श्री.संजय पांडे यांना पत्र देणार असल्याची माहिती राजन रेडकर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा