आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

मंलगगडाकडे जाणाऱ्या रस्ते, पायऱ्यांच्या मार्गासह १५ कोटी २२ लाखांच्या कामाला सुरूवात

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- श्रीमलंगगड आणि परिसरातील विविध विकासकामांना आज सुरुवात झाली असून  हाजीमलंगवाडी ते फेनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशन पर्यंतची चारपदरी रस्ता,बक्तारशाह बाबा दर्गा पासून श्रीमलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला घडीव दगडाच्या खांडकी पेव्हिंगच्या माध्यमातून पायऱ्या आणि त्याला  सुरक्षा रेलिंग, आंबे गाव रस्त्यावर साकव आणि  उसाटणे ,बुर्दूल ,नाऱ्हेण,पाली,चिरड,शेलारपाडा या रस्त्य़ाच्या कामाचे आज भूमिपुजन करत या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. श्रीमलंगगड परिसराचा सर्वांगिण विकास केला जाईल, असे आश्वासन याप्रसंगी दिले.

   २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी या भागात फिरताना येथील गरजा ओळखून घेतल्या होत्या. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेताना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता भाऊसाहेब दांगडे यांनी आवर्जुन या भागाची माहिती घेत कामांना गती दिल्यामुळे त्यामुळे लवकरच हाजीमलंगवाडी आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न पहिलांद्याच सोडवला जाणार आहे. त्यासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या भागातील रस्त्यांची कामे पूर्ण होऊन इथला प्रवास सुखकर होईल तसेच अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील शाळांचे रूप लवकरच बदलवले जाणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.

   याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, अब्दुल बाबाजी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गणपत गायकवाड, बांधकाम सभापती वंदना भांडे, सुवर्णा राऊत, श्याम बाबू पाटील, तेजश्री जाधव, सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 खालील कामांना आज सुरूवात झाली…

१. हाजीमलंगवाडी ते फेनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशन पर्यंतची चारपदरी रस्ता निधीः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९.५० कोटी मंजूर.

२. बक्तारशाह बाबा दर्गापासून श्रीमलंगगडकडे जाणाऱ्या रस्त्याला घडीव दगडाचे खांडकी पेव्हिंगद्वारे पायऱ्या आणि सुरक्षा रेलिंग उभारणार निधीः पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांतून १ कोटी अनुदान.

३. अंबरनाथ तालुक्यातील आंबे रस्त्यावर साकव उभारणार निधीः ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडून ५७ लाखांचा निधी मंजूर.

४. उसाटने बुर्दुल ते नार्हेन - पाली - चिरड - शेलारपाडा रस्ता निधीः प्रधान ग्राम सडक योजनेतुन ४ कोटी ६५ लाखांचा निधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...