आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

सावित्रीमाई फुले यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून आजच्या काळातील रणरागिनींना व्यसनमुक्तीचा संदेश

मुंबई (शांताराम गुडेकर/प्रियांका सवाखंडे)   महाराष्ट्रात गावोगावी तसेच देशभर सावित्री बाई फुले यांचा जन्मोउत्सव या वर्षी ३ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत पूर्ण सप्ताह साजरा केला जाणार आहे. याचे औचित्य साधून  हुतात्मा हिराजी पाटील ज्यु. कॉलेज, कडाव, कर्जत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन बदलापूर - अंबरनाथ कार्यकर्ता आणि सदस्य यांनी मिळून ही जयंती साजरी केली.हुतात्मा हिराजी पाटील ज्यु. कॉलेज, कडाव येथे सकाळी ११.३० वाजता सावित्रीमाई यांच्या फोटोस हार घालून दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिष्ठान मुंबई चे संस्थापक अध्यक्ष अनिल शे. कृ. चाळके, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या मुंबई संघटक प्रियांका सवाखंडे तसेच कॉलेजच्या प्राचार्य मनीषा बैकर यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांनी सावित्री माईंच्या स्मृतींना अभिवादन केले. मुलींनी स्वागत गीत म्हणून सावित्रीमाई फुले यांचेवर एक समूह गीत सादर केले. वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहून, कोरोना काळातील सेवेत प्राण गमावलेल्या विरांना तसेच इतर लोकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

           आजच्या काळातील स्त्रिया आणि तरुणी व त्या काळातील प्रगल्भ सावित्री या विषयाला धरून स्त्रियांची सद्या वाढत चाललेली व्यसनाधीनता यावर संवाद घेण्यासाठी प्रथम कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपासच्या आणि ग्रामपंचायत येथपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पोस्टर्स प्रदर्शन, घोष वाक्य देऊन रॅली काढण्यात आली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन गावातील घराघरात, दुकानांमध्ये पत्रक वाटप करून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. पुन्हा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आल्यावर कलम ४७ चे वाचन प्रियांका सवाखंडे यांनी करून विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजावून सांगितला. त्याचबरोबर सावित्री फुले यांचे शिक्षणातील योगदान आणि त्यांचा शिक्षणप्रसारासाठी दृढ निश्चय यावर प्रबोधन करत मुलींशी संवाद साधला. व्यसनमुक्ती या विषयाला अनुसरून विविध व्यसनांचे प्रकार, दुष्परिणामांवर संवाद साधत व्यसनांच्या अधीनतेतून महिलांच्या बाबतीत समाजात घडत असलेल्या विविध घटनांची माहिती देत विद्यार्थ्यांनी योग्य निर्णयशक्ती निर्माण करून मेहनत करून आयुष्य सफल करावे आणि समाजासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. सामाजिक करकर्ते अनिल चाळके यांनी हसत खेळत गप्पा गोष्टीतून व्यसन का लागते? ते कसे सोडावे ? व्यसनी लोकांशी  कसा व्यवहार करावा, त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी कशी मदत करावी याबाबत योग्य  मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना असलेले प्रश्न विचारले त्यावर समाधान कारक उत्तरे देण्यात आली.

    कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ आणि कॉलेजचे स्मृती सन्मान चिन्ह देऊन आभार मानले. प्रियांका यांनी व्यसनमुक्तीची शपथ देऊन मुलींनी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने समारोप केला. यावेळी या ज्ञानकमल शिक्षण संस्थेचे सचिव नामदेव बैकर तसेच कॉलेजच्या प्राध्यापिका राधिका राणे, योगिता जाधव, वैष्णवी ठोंबरे, पुर्णिमा जाधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...