आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

जिल्ह्यातील तरुणांना उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी प्रयत्न करणार - चेतन दळवी

 

कोकण(दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या कोकणामध्द्ये असे अनेक सुशिक्षित तरुण आहेत की ते नोकरीसाठी मुंबईची वाट धरतात. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेलं असताना सुद्धा अपुऱ्या मार्गदर्शनामुळे उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत आज कोकणामध्ये आंबा, काजू , मच्छी , कोकम, डेरी व्यवसाय असे अनेक व्यवसाय बँकेच्या अर्तसहाय्याने करण्यासारखे आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस या नात्याने प्रथम प्राधान्य मी कोकणातील तरुणांना या व्यवसायाकडे येण्यासाठी देणार आहे. येत्या काही कालावधी मध्ये शासनाच्या कोरोनाच्या अटी शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील तरुणांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबिर घेण्याचा मानस राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...