नालासोपारा( दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर) संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून चौथ्यांदा के. एम. पि. डी विद्यालय येथेनालासोपारा येथे रविवारी २६ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा ५०१ रक्तदात्यांनी रक्त देऊन इतिहासीक रक्तदान शिबीरची नोंद केली. तर मागील वेळी रविवारी ८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा एकदा ६११ रक्तदात्यांनी रक्त देऊन इतिहासीक रक्तदान शिबीरची नोंद केली होती.रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान मानले जात असताना आताच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्तचा तुटवढा भासत आहे. विविध संस्था रक्तदान शिबिरचे उपक्रम राबवत असून देखील ही रक्तदानाची समस्या दिवसांन दिवस वाढत आहे. अशातच संतोष अबगुल प्रतिष्ठांचे प्रेरणास्थान श्री. संतोष अबगुल यांच्या माध्यमातून दर वर्षी विविध सामाजिक व वैद्यकीय, महिलान साठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी असे विविध मोफत उपचार उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकी व नागरिकांना आपुलकीचे नाते जोडले जात आहे. (जेथे समस्या तेथे संतोष अबगुल प्रतिष्ठान) अशी प्रतिमा जनतेने आपल्या मनात उतरवली असल्याचे आजच्या रक्तदान योदनाने प्रदर्शित झाले. रविवारी सकाळ पासूनच के.एम. पि. डी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तुलिंज रोड नालासोपारा पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराने प्रामुख्याने सर्व सभासदांना इछुक नागरिकांनी देखील सहभाग घेतला या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता झाला तर श्री संतोष दादा अगबुल व माजी सभापती श्री. निलेशजी देशमुख साहेब. यांनी सर्वात मोलाचे सहकार्य केले तर अविनाशजी जाधव, शिवसेना युवा नेते श्री. पंकजजी देशमुख, डॉ संजयजी जाधव, अवधूत लिंगायत, व प्रतिष्ठाण चे सदस्य या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना काळात रक्त उपलब्ध होत नाही म्हणून रुग्णाच्या नातरवाईकांची तारांबळ होते. हे पाहून व त्याची उणीव भासू नये म्हणून संस्थापक श्री संतोष अबगुल यांच्या माध्यमातून संतोष अबगुल प्रतिष्टान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून तिसऱ्यांदा भव्य रक्तदान शिबिरा करण्यात आले.या प्रतिष्ठान च्या सहयोगात महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक नवी मुंबई, साथीया ब्लड बँक, नवी मुंबई, सायन ब्लड बँक आणि विजया ब्लड बँक यांनी सहयोग दिला.या शिबिरात प्रमुख्याने सात ते आठ तालुक्यातील रक्तदातांनी सहभाग घेतला. त्यात महिलानी सुद्धा उसूक्त पणे सहयोग दिला. संतोष अगबुल प्रतिष्ठान हे केवळ प्रतिष्ठान नसून आपच्या परिवाराचा हिस्सा असल्याचे श्री. संतोषजी अगबुल यांनी मनोगत वेक्त केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असता ५०१ रक्त दाता लाभले. असा ईतिहास नालासोपारा परिसरात प्रथमच या प्रतिष्ठानने केल्याचे संबोधले जाते आहे. या कार्यक्रमात सर्व सभासदांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला.प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान श्री. संतोष अगबुलयांनी स्वःता वयक्तिक आभार मानले. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी कोणहीती मदत लागल्यास मी सदैव आपल्या सेवे साठी हजर राहण्याचे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा