आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

गाव विकास समितीमार्फत राबविण्यात येणारा जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम सामान्य माणसाचा आवाज बळकट करेल ; स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित रेवाळे यांचा उपक्रमास पाठिंबा

कोकण (शांताराम गुडेकर) गाव विकास समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम ग्रामीण भागात सामान्य माणसाला ताकद देणारा असून सामान्य माणसाच्या सूचनांचा आदर करून निर्माण होणाऱ्या या विकासनाम्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,लोकहिताच्या या उपक्रमास माझा नागरिक म्हणून पाठिंबा आहे असे मत स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित रेवाळे यांनी व्यक्त केले आहे.आजच्या घडीला प्रस्थापित राजकीय नेते सामान्य लोकांवर आपली मते लादत असताना दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांची संघटना असणाऱ्या गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जात आहेत, कोकणात विकासाच्या नावाखाली अनेकांनी आपली घरे भरली मात्र कोकणचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर येथील गावांचा,गावातील माणसांचा विकास व्हायला हवा ही भूमिका घेऊन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड लढत आहेत ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे असेही अमित रेवाले यांनी म्हटले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असतात.राजकिय दबाव व स्थानिक राजकिय पुढारी यांच्या अनास्थेमुळे अनेक वेळा सामान्य नागरिक आपल्या समस्या प्रखरपणे मांडत नाहीत मात्र आता गाव विकास समितीने जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम हाती घेऊन सामान्य माणसाला त्याचा आवाज बुलंद करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मी स्वतः जनतेचा जाहीरनामा या उपक्रमात सहभागी होणार असून इतर नागरिकांनी देखील आपल्या गावातील समस्या, सूचना जनतेचा जाहीरनामा या उपक्रमासाठी पाठवाव्यात असे आवाहन अमित रेवाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...