ठाणे /प्रतिनिधी : बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या कार्याची दाखल घेत सेवक सेवाभावी संस्थाच्या वतीने आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार देऊन रविवारी दि. २६ डिसेंबर रोजी कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ, जलगांव येथे गौरविण्यात आले. यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, जळगावचे महापौर जयश्री ताई महाजन, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंकुश आगलावे, 'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी, डॉ.ऍड.जया उभे, व इतर मान्यवर उपस्तिथ होते. जळगावचे महापौर जयश्री ताई महाजन व 'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी ह्यांच्या हस्ते आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कारने गौरविण्यात आले. कार्यक्रम अगदी सुंदररित्या पार पडला, ह्या वेळी विविध क्षेत्रातून विविध पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले.
डॉ .निचत यांच्या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 165 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 2021 ह्या वर्षीचा आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कारने गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा