अलिबाग:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत व "सुप्रशासन सप्ताहाच्या" निमित्ताने दि.24 डिसेंबर रोजी गोदरेज अँड बॉईज तालुका खालापूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ५१ बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.यावेळी कामगार उपायुक्त श्री. प्र.ना. पवार, सहायक कामगार आयुक्त श्री.समीर चव्हाण व इतर कार्यालयीन कर्मचारी, प्रकल्प अधिकारी श्री. रमेश भंडारकर, मनुष्यबळ व्यवस्थापक श्री.राजेंद्र पाशिलकर, जनरल मॅनेजर श्री. अमित कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमावेळी सर्व उपस्थित बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणाचे महत्त्व पटवून देत जास्तीत जास्त कामगारांनी कामगार विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा