अलिबाग : दि.24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील दि.17 डिसेंबर, 2021 च्या आदेशानुसार या वर्षाचा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने Consumer Know Your Rights अशी संकल्पना निश्चित केली आहे.
त्यानुसार शासनाच्या विविध योजना व ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्यामधील हक्काचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चित्ररथ व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्ररथास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष रविंद्र नगरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या कार्यक्रमास तहसिलदार महसूल सचिन शेजाळ, तहसिलदार सर्वसाधारण विशाल दौंडकर, सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सहा.आयुक्त, समाजकल्याण सुनिल जाधव, रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, विकास खोलपे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर हा चित्ररथ अलिबाग, पेण व मुरुड या तालुक्यामध्ये फिरविण्यात आला. तसेच रायगड जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार या संकल्पनेवर आधारित प्रिझम सामाजिक विकास संस्थेव्दारे पथनाटयाचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाटयाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, अलिबाग समुद्र किनारा व एस.टी. स्टॅंड अलिबाग येथे करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा