आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती

अलिबाग: शासन निर्णयानुसार मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 आक्टोबर, 2021 च्या आदेशान्वये सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार क्रमांकाव्दारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. 

      राज्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हयातील सर्व कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्यासाठी नातेवाईकांकडून अर्ज दाखल करणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे इ.मार्गदर्शन करण्यासाठी गावापापतळीवरील आशा कार्यकर्तीमार्फत अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना नोडल ऑफीसर म्हणून नियुक्त केले आहे.

      जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क व समन्वय साधून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गावपातळीवर कार्यरत आशा कार्यकर्तीमार्फत कोविड-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांकडून शासन निर्णयातील सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायतमार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. ज्यांनी अर्ज भरले आहेत व ज्यांची कागदपत्रांच्या अभावी अर्ज स्विकारलेले नाहीत, अशा नागरिकांना देखील आवश्यक मदत तातडीने करावयाची आहे.

      आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 मुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना वरीलप्रमाणे आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांनी देखील याकामी आपल्याकडील आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. जिल्हयातील सर्व कोविड-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत सानुग्रह सहाय्य वाटप करण्याचे असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...