आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

रायगड भूषण मनोज पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

उरण - महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष तथा उरण तालुक्यातील पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था चिरनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा तसेच चिरनेर परिसर कार्यक्षेत्रातील उरण वनविभागाच्या वनअधिकाऱ्यांचे यावेळी सन्मान करण्यात आले. वनक्षेत्रात वणवा विझविण्याचे काम असो, मानवी वस्तीतून साप पकडून वनपरिसरात सोडून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य असो, किंवा वृक्षलागवड करुन येथील पर्यावरणासाठी धडपड करण्याचे कार्य लक्षात घेवुन वाढदिवसानिमित्त ३० युवकांना सन्मानपत्र व मेडल देवुन गौरव करण्यात आले. मनोज पाटील यांच्या २५ वर्षाच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०१६ साली रायगड भूषण पुरस्कार, तर नेहरू युवा केंद्र भारत सरकार तर्फे २००१ मध्ये युवा पुरस्कार मिळाले आहे.मनोज पाटील हे शिक्षक आहेत, त्यांनी शैक्षणीक स्तरावर उत्तम कामगिरी करीत त्या क्षेत्रात ही २०११ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान प्राप्त करुन यशाच्या शिखरावर आपले नाव कोरले आहे.आजच्या वाढदिवशी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. संगिता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन धुतुम आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे ह्या संस्थाना एकत्र करित सामाजिक बांधिलकी जपत चांदायली वाडीतील मुलांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. सदर कार्यक्रमास वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचा मोलाचा वाटा ठरला. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य वैजनाथदादा ठाकूर, आदीवासी विकास प्रकल्प माजी नियोजन अधिकारी श्रीधर मोकल, महिला मंडळाच्या प्रमुख संतोष बेन, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, काशिनाथ खारपाटील, पंकज घरत,रूपेश भोईर, विशाल पाटील, प्रतिक कोळी, बंटी मढवी, जतीन मढवी, विनित मढवी आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: