आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

जे एन पी टी मध्ये दक्षता जनजागृती सप्ताहला सुरुवात ; भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा.

उरण -रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जे एन पी टी बंदर प्रशासनाने २६  ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, शेवा,  येथील दक्षता जागरुकता सप्ताह- २०२१ ची थीम आहे " स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीसह स्वावलंबन".यामध्ये दक्षता जागरुकता सप्ताहादरम्यान  ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍इन्फॉर्मर (पीआयडीपीआय)  दृढनिश्चय करणे,  अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस कीपिंग क्रिया कला, भ्रष्टाचार निर्मूलन यांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे.

     "स्वतंत्र भारत@ ७५ सचोटीसह स्वावलंबन", या संकल्पनेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ११.१५ वाजता जे एन पी टी येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेतली. 

    जे एन पी टी मार्फत  दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त जन जागृती केली जात आहे. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य मध्ये दक्षता  मोहिमे अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे, तसेच  अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी व सर्व  नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन लाच मागणाऱ्या विरुध्द तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

      तसेच कोणतेही काम हे कायद्याच्या नियमात राहून केले पाहिजे त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे कठोर व प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कोणी पैशाची मागणी करत असल्यास त्याची तक्रार संबंधित विभागाकडे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पैश्याची कोणतीही मागणी न करता काम करण्याचे , भ्रष्टाचार ही किड असून त्याचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

     यावेळी विद्याधर ए मालेगावकर IRTS - मुख्य दक्षता अधिकारी ,  कुमार एम अंकलेकर - Dy.  मुख्य दक्षता अधिकारी ,   जितेंद्र आर गद्रे सहायक व्यवस्थापक (दक्षता) ,  विश्वास बी खैरनार - अधीक्षक (दक्षता), प्रशांत एस शुक्ला - सहायक अभियंता (दक्षता) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: