आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

सेझ समस्या संदर्भात खासदार कपील पाटील यांच्यासमवेत बैठक


उरण - खासदार कपिल पाटील( राज्यमंत्री- पंचायत राज्य भारत सरकार) यांच्याकडे उरण-पेण-पनवेल येथील महामुंबई सेझ ने ज्या जमिनींचा भूसंपादन करून 45 गावातील शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने व काहींची तर फसवणूक करून घेतली होती. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या भिवंडी येथील निवास स्थानी मिटिंग लावण्यात आली होती. व ही मिटिंग जवळपास अर्धा तास त्यांच्या कार्यालयात चालली.खासदार तथा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल व पुढील मिटिंग ही सह्याद्री अतिथीगृहात महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी रायगड व सर्व संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्या समवेत लावण्यात येईल असे सांगितले.सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असेही खासदार कपील पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. ह्या प्रसंगी पेण येथील सेझ च्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लढा देणारे प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष कृष्णा वर्तक, कायदेशीर सल्लागार डी. पी. म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रभाकर मोकाशी व उरण पूर्व विभागातील गोरख ठाकूर,चंद्रकांत घरत, भुपेंद्र ठाकूर, सुरज म्हात्रे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने आम्ही उरण पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार कपील पाटील यांची भेट घेऊन सेझ ची समस्या त्यांच्या समोर मांडली असल्याचे उरण पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी सांगितले. या बाबतीत खासदार कपील पाटील यांची भूमिका हे सकारात्मक असल्याने लवकरच हा प्रश्न सुटेल अशी आशा उरण, पनवेल, पेण मधील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: