आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न...!

 

इचलकरंजी- (गुरुनाथ तिरपणकर)  इचलकरंजी-येथील देवांग मंदीरामध्ये नुकतीच महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ,मुंबई या राज्यव्यापी विणकरांच्या शिखर संस्थेची ४१वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी समाजाचे युवा नेते कोल्हापुरचे राजेंद्र ढवळे यांनी सर्वांचे स्वागत केले. मिलिंद कांबळे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. तर अजेंड्यावरील विषयांचे वाचन करुन उपस्थितांकडुन सर्व ठरावांना मंजुरी मिळाली.यावेळी अध्यक्षीय अहवालांमध्ये बोलताना श्री.प्रकाशराव पाचपुते यांनी सांगितले की मी अध्यक्ष झाल्यापासून कराड,मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील प्रत्यक्ष ऑफलाईन सभा झाल्यावर कोरोना महामारीमुळे ऑनलाईन झूमच्या माध्यमातून चार वेळा बैठका झाल्या. विणकर दिनानिमित्त शहरातील यशश्री वस्त्रोद्योगातील उद्योजकांना 'वस्त्रोद्योग पुरस्कार,देऊन सन्मानित करण्यात आले. तर कोकणातील खेड व चिपळुण येथील पूरग्रस्त समाजबांधवांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच खेळाडुंना प्रोत्साहन म्हणुन त्यांना आर्थिक सहाय्य दिले असुन भविष्यामधे शिक्षण व क्रिडा,आरोग्य व औषधोपचार, नैसर्गिक आपत्ती सहाय्य व समाज उन्नतीकरता देवांग व चौंडेश्वरी मंदीर सहाय्य निधी इ.योजना राबविणार असल्याचे सांगितले. सभेस उपस्थित असणारे विश्वस्त उत्तमराव म्हेत्रे यांनी देवांग समाजाचे नेते संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलाराव डाके यांचा सत्कार केला. तसेच श्रीकांतराव फाटक, रामदास चौगुले, सौ.सुधा ढवळे, सौ.प्राजक्ता होगाडे, सौ.सुशिला फाटक यांचेसह कोल्हापुरचे महादेवराव इदाते, शशिकांत हावळ यांचा सत्कार केला. शेवटी महादेवराव सातपुते यांनी आभार व्यक्त केले.यावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून मुंबईहून विश्वस्त प्रकाशशेठ कांबळे, अरविंदराव तापोळे, अंकुशराव उकार्डे, भास्करराव रोकडा,ट्रेझरर विश्वनाथ पोयेकर, कोकणातुन माजी अध्यक्ष चंद्रकांत बाईत,पुण्याहून सुरेशराव तावरे, दत्तात्रय ढगे,कणकवलीहून रविंद्र मुसळे, खेडहून प्रविण दिवटे यांचेसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.तर समक्ष श्रीनिवास सातपुते, दिलीपराव भंडारे,शिवाजीराव रेडकर, शिरीषराव कांबळे, शितल सातपुते,मोहनराव हजारे मनोज खेतमर यांचेसह अनेक सदस्य ऑफलाईन ऑनलाईन हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: