आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

कोकण भवन बेलापूर येथील सहकारी संस्था निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबई मनपाच्या हद्दीत स्थलांतरीत करण्याची गुणवंत कामगार प्रभाकर कांबळेची मागणी

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) - नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत  सी बी डी बेलापूर कोकण भवन इथे असलेली सहकारी संस्था निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत स्थलांतरीत करण्याची मागणी मुंबई पूर्व उपनगरातील सहकारी संस्थाधारक  व सभासदांच्या वतीने सहकारातील निष्ठावान कार्यकर्ते व सहकार रत्न श्री प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रान्वये केली आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, बृहन्मुंबई महानगर पालिकेतील एल, एम, एन व एस वार्ड आलेल्या कुर्ला , चेंबूर , मानखुर्द , घाटकोपर , विद्याविहार , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप भागातील सहकारी गृहनिर्माण , सहकारी पतसंस्था व सेवा सहकारी संस्थाची प्रशासकीय जिल्हा निबंधक व उप निबंधक यांची कार्यालये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असण्याऐवजी ते कोकणभवन बेलापूर येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत १९८१ पासून कार्यरत आहेत.

    सहकारी क्षेत्र हाच देशाचा त्याचबरोबर सर्वसाधारण सभासदांचा आर्थिक कणा असून देश अधिक बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी सहकार क्षेत्राखेरीज अन्य पर्याय नाही आणि हे कार्य बसहकारी पतसंस्थाच्या माध्यमातून सुरू आहे. सहकारी पतसंस्था टिकल्या तरच मोठं - मोठ्या बँका टिकतील व सर्वसामान्य सभासद आणि सहकारी संस्थाचालकही जिवंत राहतील. यासाठी महाविकास आघाडी सरकारने कुर्ला, चेंबूर , मानखुर्द , घाटकोपर , विद्याविहार , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप येथे राहणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाच्या सभासदांना इतर वार्डाच्या तुलनेत दुजाभाव झालेला आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील लाखो सभासदांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. इतर वार्डाची सहकारी निबंधकाची कार्यालये बृहन्मुंबईतच आहेत.  त्याचप्रमाणे वरील वार्डाची सहकारी निबंधकाची कार्यालये मुंबईच्या हद्दीत स्थलांतरीत करून अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या सहकारी संस्थाच्या संस्थाधारकांना सहकार चळवळीची जाणीव असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सहकारी संस्था चालकांनी व सभासद वर्गानी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: