आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

उरणमधील लसीचा साठा वाढविण्याची आयाज फकिह यांची मागणी

उरण - उरण तालुक्यात अनेक विविध ठिकाणाहून व्यक्ती लस घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे उरण मधील स्थानिक नागरिक लसीकरणापासुन वंचित राहत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्या अगोदरच लसीकरणाचे साठे वाढवावेत.लसीकरणाचे प्रमाण वाढवावेत अशी मागणी उरणमधील सामाजिक कार्यकर्ते आयाज फकिह यांनी केली आहे.

   उरण येथे गेल्या सात ते आठ महिन्यापासून लसीकरणाचे काम चालू आहे.सदरच्या लसीकरण केंद्रावर आजूबाजूच्या परिसरातील व लांबून लोक येत आहेत.त्यामुळे लसी कमी पडत आहेत.लसीकरण केंद्रावर अलिबाग,पनवेल, उलवे नोड येथून व्यक्ती लस घेण्यासाठी उरण मध्ये येत आहेत. लसीकरणाची ऑनलाइन नावनोंदणी असल्याने कोणीही कुठूनही ऑनलाईन नोंदणी करतो. त्यामुळे उरण मधील स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.दररोज पहिला डोस 100 ते 150 तर दुसरा 70 ते 100 इतका आहे.यात वाढ होणे गरजेचे आहे.तिसरी लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांची लोकसंख्या, लसीकरण केंद्राची संख्या लक्षात घेता लसीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी यात लक्ष घालावे व लसीकरणाची समस्या दूर करावी अशी मागणी आयाज फकिह यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: