आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

अपघात रोखण्यासाठी भाजपतर्फे प्रशासनाला निवेदन

उरण - उरण तालुक्यात अपघात होऊन मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य व्यक्तीला प्रवास करताना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसापूर्वी वशेणी येथील घरातील तरुण कर्ता असलेल्या संदीप पाटील याचा अपघातात नाहक बळी गेला. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने अख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.उरण तालुक्याचा विचार करता आजपर्यंत रस्ते अपघातात 800 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून रस्ते वाहतूक करताना होणाऱ्या अपघात संदर्भात उरण तालुक्यातील पुर्व विभागाचे काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथे भाजपा उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी ए.आर.सांगळे ,सी.बी.बांगर यांच्या समोर मांडून त्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आले. वाहतूक व अपघात संदर्भात तसे निवेदनही देण्यात आले.यात प्रामुख्याने 1)खोपटे पुला खाली गतिरोधक बांधणे.2) globicon कंपनी जवळ गतिरोधक बांधणे.3)सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे गतिरोधक बांधणे 4)कॉन्टिनेंटल जवळील पुलाला लागून असलेले डिवायडर बंद करणे.कॉन्टिनेंटल ब्रिज जवळील वळण बंद करणे. 5)मुख्य रस्त्यावर विजेचे खांब, डीवायडर येथे तसेच मुख्य रस्त्यावर वाढलेली झाडी झूडपे त्वरित तोडणे.असे विविध मागण्या निवेदनद्वारे करण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टी पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील,वाहतूक सेल तालुकाध्यक्ष सुदेश पाटील,युवा सचिव विभाग  कल्पेश म्हात्रे,कोप्रोली कार्याध्यक्ष  निलेश पाटील,कोप्रोली शाखा चिटणीस प्रितम म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: