आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबुरतर्फे महाडमधील मु. मौजे तांबडभुवन व मु. मौजे किंजलघर येथे गृहपयोगी साहित्याचे मोफत वाटप



मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे मु.मौजे तांबडभुवन व मु.मौजे किंजलघर ता.महाड,जि.रायगड येथे मोफत ब्लँकेट,चादर,बेडशिट,चटईसह अन्य गृहपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमपार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून कार्यकारी संचालक आर.सी.एफ मा.सुहास शेलारसाहेब,श्री.अश्विन कांबळे साहेब (वरिष्ठ प्रबंधक मा.स. -आरसीएफ), तसेच तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी उप सचिव वैभव घरत, सल्लागार  हनुमंता चव्हाण,उपाध्यक्ष रमेश पाटील,एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक,जालिंदर इंगोले,प्रकाश मांडवकर,सुशील मिस्त्री,संजय वडाळ आदी मान्यवर   उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: