आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

सततची अतिवृष्टी,करोना महामारी, लाँकडाउन व सरकारची अनास्था यामुळे कोकणी व्यापारी देशोधडीला - सचिन नाटेकर ; ३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली मदत तात्काळ अदा करावी : सचिन नाटेकर-व्यापारी/ सामाजिक कार्यकर्ते - बांदा

व्यापारी सचिन नाटेकर 
मुंबई(समीर खाडिलकर /शांत्ताराम गुडेकर )- सर्वात जास्त कर आकारणी महाराष्ट्रात होते.देशातील प्रमुख विकसित राज्यापैकी महाराष्ट्र आहे.राज्य व देशातील विकासात उद्योग व्यापर क्षेत्राचे मोठे योगदान असतानाही मग अडचणी च्या वेळी व्यापार क्षेत्राला मदत देताना हात आखडता का घेता.आत्मनिर्भर असलेला कोकणी व्यापारी सततची अतिवृष्टी,करोना महामारी, लाँकडाउन व सरकारची अनास्था यामुळे देशोधडीला लागेला आहे.३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली  मदत अदा करावी अशी मागणी सचिन नाटेकर(व्यापारी/ सामाजिक कार्यकर्ते - बांदा) यांनी केली.अतीवृष्टी व महापुर आल्यावर राज्याच्या डझनभर मंत्र्यांचे पहाणी दौरे कोकणात  झाले.आश्वासनांचा महापुर आला.मा .मुख्यमंत्र्यांनी  तर मी पँकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसुन प्रत्यक्षात मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षाचे दिग्गज नेतेही आपल्या कार्यकर्ते च्या फ़ौजफाट्यासह कोकणात आले. सरकार वर टिकेची झोड उठवली.सरकारला मदत देण्यास भाग पाडू असे सांगितले.जसा महापुर ओसरला तसा सरकार व विरोधी पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचा महापुरही ओसरला. प्रत्यक्षात व्यापारीच्या पदरात काहीच पडले नाही.आता काय व्यापारीच्या आत्महत्या होण्याची वाट पहाता काय.लवकरात लवकर व्यापारीना मदत द्या.अन्यथा व्यापारीना आंदोलन करावे लागेल.२०१९ व २०२१ चा महापुर, करोना महामारी, सततचे लाँकडाउन यामुळे कोकणातील व्यापारी चे कंबरडे मोडले आहे.व्यापारी बांधवाना पक्षीय राजकारणात स्वारस्य नाही.तरीही सरकार व विरोधी पक्ष यांना एकमेकांवर कुरघोडी करून वेळ मिळाल्यास व्यापारी, कष्टकरी, शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा.सरकारकडून व्यापारी च्या काही माफक अपेक्षा आहेत.त्या पुर्ण कराव्यात आशी मागणी सचिन नाटेकर व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते (बांदा)यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: