आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ जून, २०२०

उमद्या अभिनेत्यास बॉलीवूड मुकले...

बॉलिवूडचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडसह चित्रपटरसिकांनाही धक्का बसला आहे. त्याचे असे जाणे कोणीही अपिक्षिले नव्हते. त्याची आत्महत्या अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. त्याने आत्महत्या का केली याचे उत्तर कोणाकडे नाही. तो नैराश्याग्रस्त झाला होता म्हणून त्याने आत्महत्या केली असे सांगितले जाते पण त्याला नैराश्य का आले होते याचेही उत्तर कोणाकडे नाही. असे असले तरी त्याचे जाणे चित्रपटरसिकांना चटका लावून जाणारे आहे. कारण त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी असाच होता.  कोणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये यशस्वी होणे ही अवघड गोष्ट आहे सुशांत सिंह ने ती सध्या केली. सुशांत सिंह म्हणजे बॉलिवूड साठी परफेक्ट पॅकेज होता. दिसायला सुंदर असणारा सुशांत नृत्यातही प्रवीण होता. शामक डावर यांच्या नृत्यशाळेत त्याने नृत्याचे धडे गिरवले. बिहार हा मूळचा बिहारमधील पाटणा शहरातला त्याचे शालेय शिक्षण तिथेच झाले. पुढे शिक्षणासाठी तो दिल्लीत आला. दिल्लीत त्याने इंजिनिअरिंग  चे उच्चशिक्षण  घेतले. शिक्षणात हुशार असला तरी त्याचे लक्ष बॉलिवूड हेच होते त्यासाठी तो मुंबईत आला. मुंबईत आल्यावर त्याने खूप स्ट्रगल केले. अखेर त्याला एकता कपूर याने किस देश मे है मेरा दिल या मालिकेत संधी दिली. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती पवित्र रिशता या मालिकेने. या मालिकेतील त्याची मानव ही भूमिका खूप गाजली. य भूमिकेने त्याला स्टारडम मिळवून दिले. या मालिकेनेच त्याला बॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले. काय पो छे  हा त्याचा बॉलिवूडमधला पहिला चित्रपट हा चित्रपट हिट झाला. पहिल्याच चित्रपटात त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. काय पो छे नंतर त्याने शुद्ध देशी रोमान्स, पी के, डिटेक्टिव् व्योमकेश बक्षी, एम एस धोनी ,राबता, वेलकम, न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिडीया, छिछोरे, ड्राईव्ह, दिल बेचारा असे चित्रपट केले. त्याने केवळ सात वर्षात बारा चित्रपट केले. ही मोठी कामगिरी आहे. त्याने चित्रपट हिट होण्यासाठी खूप मेहनत घेतली. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी तब्बल ९ महिने मेहनत घेतली. हा चित्रपटही तुफान हिट झाला. तो बॉलिवूड चा भावी सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. टीव्ही तसेच चित्रपट या दोन्ही माध्यमात यशस्वी होणारे सुशांत सिंह सारखे खुप कमी अभिनेते आहेत. त्यामुळेच त्याच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांनाही खूप दुःख झाले आहे. त्याच्या जाण्याने एका उमद्या कलाकाराला बॉलिवूड मुकले आहे. सुशांत सिंह राजपूतला भावपूर्ण श्रद्धांजली !

 श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड -जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवाशक्ती स्वयंसेवी संस्था नवी मुंबई व विद्यार्थी प्रतिष्ठान भांडुप वतीने शांतीवन पनवेल येथे केली दिवाळी साजरी

पनवेल( प्रतिनिधी):   युवाशक्ती स्वयंसेवी संस्था, नवी मुंबई च्या वतीने दरवर्षी सामाजिक भान जपणारा दिवाळी उपक्रम राबवला जातो. दिवा...