आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ जून, २०२०

हृदयद्रावक !

टी व्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची सुरुवात करून अल्पावधीतच पवित्र रिश्ता मालिकेद्वारे आपल्या सहज, सुंदर अभिनयाद्वारे घराघरात पोहचलेला तर एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारा मेहनती, चित्रपटसृष्टीतील एक तारा सुशांत सिंग राजपूत यांनी केवळ वयाच्या ३४ व्या वर्षी या दुनियेचा निरोप घ्यावा यासारखी दुर्दैवी गोष्ट ती कोणती असू शकते? सुशांतचे जाणे सिनेसृष्टीलाच नव्हे तर त्याच्या तमाम चाहत्यांना एक जबरदस्त धक्का असून एका उमद्या, हरहुन्नरी कलावंताला सिनेसृष्टी मुकलीय अस म्हटल्यास वावगे होणार नाही. एक दुर्दैवी, तितकीच हृदयद्रावक घटना. आपल्या छोट्याश्या कारकीर्दीतून पोछे, छिछोरे, रोमांस आदि चित्रपटातूनही आपल्या अभिनयाच्या विविध कंगोर्‍यातून रसिक मनाला सुशांत यांनी दिलेला आनंद रसिकमन कधी विसरणार नाही. सुशांत सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...