आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ जून, २०२०

गणपतीमध्ये कोकण रेल्वेच्या जास्तीत जास्त गाड्यांना संगमेश्वार स्थानकात थांबा मिळावा ; निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वार फेसबुक ग्रुपची मागणी


मुंबई(शांताराम गुडेकर )

     गणेशोत्सव हा सण सर्वच कोकणवासियांचा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील हजारो कोकणी चाकरमानी गणेशोत्सवात गावाकडे जात असतात. या नागरिकांची सोय व्हावी म्हणून कोकणात जाणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्रही त्यांनी नुकतेच कोकण रेल्वेचे प्रबंधक शैलेश आंबार्डेकर आणि खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.

  गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे येथून कोकणात येत असतात. संगमेश्वर तालुक्यात ११६ गावे असून हजारो नागरिकांसाठी हे स्थान महत्त्वाचे आहे. मात्र, या स्थानकात फक्त विशेष गाड्यांनाच थांबा मिळतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी आहे. प्रशासनाने लांब पल्ल्याच्या धावणार्‍या इतर गाड्यांनाही या स्थानकात थांबा दिल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार असून प्रशासनाचा इतर रेल्वेवरील भारही हलका होणार आहे. अशा मागणीचे पत्र निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने कोकण रेल्वे प्रशासन आणि खासदार विनायक राऊत यांंना दिले आहे. यावेळी पत्रकार संदेश जिमन, सुधीर मुणगेकर, संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र खानविलकर, जेष्ठ कार्यकर्ते चंदक्रांत भेकरे, समन्वयक दिपक पवार, सतीश मालप जगदीश कदम, सुहास कदम आणि अजित सुर्वे उपस्थित होते.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

मागणी योग्य आहे

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...