आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ मे, २०२०

पवईच्या म.फुले नगरमधील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.

मुंबई -(अविनाश हजारे)

 पवईच्या महात्मा फुले नगर येथील एका ५७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये दि.९ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रक्तदाब, मधूमेह सारखा आजाराने त्रस्त असताना कोरोना वायरस चे लक्षणेही त्यांच्यात आढळून आले होते. 
दि. २७ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना पालिकेच्या राजावाडी रुग्णालायत हलवण्यात आले. आणि त्यांच्या कुटुंबियांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दररोज त्यांचे त्यांच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणे होत असल्याने त्यांची तब्येत स्थिर असल्याचे ते कळवत होते. मात्र, आज दि.९ रोजी सकाळी त्यांचा मुलगा तुषार याला रुग्णालयातून फोन आला असता रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या बाबाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. 

   "वडिलांना शेवटचं बघू द्या..."

 दुःखद बाब म्हणजे, विलगिकरण कक्षात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करता आले नाहीत. 
नियमांचं कारण देत प्रशासनाने त्यांच्या ५ नातेवाईकांच्या उपस्थितीत विक्रोळीच्या टागोर नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांना शेवटचे देखील पाहायला न मिळाल्याने त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
  
====================================  
" रात्री बरे होते म्हणून हॉस्पिटलमधून सांगण्यात आले. त्यांच्या रिपोर्ट संदर्भात ही मला काहीच माहीती दिली नाही. आज अचानक कॉल करून कळवले की, वडिलांचा मृत्यू झाला आहे म्हणून, त्यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आज ही स्थिती आली आहे. "
      - तुषार तांबे ( मुलगा )
=====================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...