आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ११ मे, २०२०

सोसायटीत प्रवेश करताच रहिवाशी होणार सॅनिटाईझ ! भांडुपच्या शिवछाया सोसायटीचा प्रयोग...


मुंबई -(अविनाश हजारे)

               सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा झपाट्याने होणारा संसर्ग ना प्रशासन नियंत्रित करू शकली आहे, ना सरकार.  पण, नागरिक मात्र, याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध युक्त्या आजमावत आहेत.भांडुप पश्चिमेच्या एका सोसायटीने आपल्या प्रवेशद्वारावर चक्क डेटॉल लिक्विडयुक्त जंतुनाशक फवारणी मशीन बसवून घेतली आहे. 
            सर्वोदय नगर येथील शिवछाया सोसायटीने हा अनोखा प्रयोग केला आहे. या सोसायटीचे रहिवाशी वा कुणी बाहेरचा व्यक्ती आतमध्ये प्रवेश करताच या प्रवेशद्वारावर असलेल्या लिक्विडयुक्त जंतुनाशक फवारणी यंत्र ऍक्टिव्ह होऊन त्या व्यक्तीच्या अंगावर ते रसायन शिंपडले जात असल्याने त्या व्यक्तीचा सॅनिटाईझ होऊनच आतमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग शत:प्रतिशत रोखण्यास मदत होत असल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे. 
          हे फवारणी यंत्र नगरसेविका जागृती पाटील व कौशिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आले असून, या यंत्राची निर्मिती मंगेश तावडे या तरुणाने केली असल्याची माहिती सुशांत पाटणकर यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...