आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

दिबा नामकरण मुद्दा पुन्हा चर्चेत ; जासई येथे मोठी बैठक! आरपारची लढाई!!

मुंबई (सतिश पाटील ): ( जासई) उरण येथे आरपारची लढाई, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर चळवळ सर्व पक्षीय बैठक नुकतीच आयोजित केली होती.यावेळी सर्व भुमिपुत्राचा चांगला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. अनेक मान्यवर व भूमिपुत्राचे सुचक असे मार्गदर्शन व सुचना मांडण्यात आल्या. किती वेळ सरकार च्या अश्वासनाची वाट बघायची ? २००८ पासून मागणी प्रलंबित आहे. अनेकदा मोर्चे, आंदोलन रॅली मूक मोर्चा साठी उपोषण धरणे तसेच ऑगस्ट महिन्यात थेट जंतर मंतर वर देखील मोर्चा काढून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न भूमिपुत्रांनी केला पण हवा तसा प्रतिसाद सरकारकडून आजपर्यंत मिळाला नाही. फक्त राज्य सरकार व मुख्यमंत्री यांनी आम्ही आमच्याकडून हिरवा कंदील दिला असं जाहीर केले. पण केंद्र सरकारकडून जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत नामकरण प्रस्ताव प्रलंबित व उपेक्षित आहे. तांत्रिक अडचण सांगितली जाते,अनेक पत्रव्यवहार झाले, उड्डाणं मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला.तसेच अनेक खासदारांनी नामकरणाचा मुद्दा सासंदेत उचलून धरला तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे असे एकंदरीत दिसून येत आहे. 
आता शेवटी आरपार ची लढाई म्हणून काही पुन्हा केंद्र सरकारची भेट घेऊन वेळ मागितली जाणार असे आजच्या बैठकीत मान्य करण्यात आले. त्या नंतर बाकी सर्वस्वी सरकार, प्रशासन जबाबदार असणार असे पवित्रा घेतला आहे. काही दिवस गावोगावी बैठक घेऊन जनजागृती मोहीम चालू केली जाणार आहे. पुढील बैठक लवकरच घेतली जाईल.या बैठकीला दिबा पाटील सर्व पक्षीय नामकरण कृती समितीचे अध्यक्ष  मा.दशरथ दादा पाटील यांची प्रकृती ठिक नसताना देखिल उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

मराठमोळं मुलुंड" संस्थेतर्फे पालघर मधील आदिवासी वाड्यांमध्ये फराळ वाटप

मुंबई (पी.डी. पाटील ): दिवाळीचे औचित्य साधून, रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी "मराठमोळं मुलुंड" संस्थेतर्फे ओगदा, ग्रामपंचायत. मुक्काम पोस्ट परळी - मोहमाड व ताडमाळ , तालुका - वाडा, जिल्हा - पालघर  येथील अति दुर्गम व गरिबी असलेल्या दोन आदिवासी वाड्यांमध्ये जवळजवळ शंभर कुटुंबीयां करिता दीपावलीचा फराळ वाटप,तसेच त्या दोन्ही वाड्यांमध्ये आकाश कंदील वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दोन्ही गावांमधील रस्त्यांना दिवे नसल्याकारणाने दोन्ही गावांमधे (सोलर स्ट्रीट लाईट) कायमस्वरूपी भेट म्हणून मराठमोळं मुलुंड संस्थेतर्फे देण्याचे ठरविले आहे. 
      या उपक्रमास साधारण १,५०,०००/-एक लाख पंन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तरी ज्या कोणाला या कार्यास मदत करावयाची असल्यास त्यांनी संस्थेच्या बँकेच्या क्यू आर कोडवर देणगी देऊ शकता. 80 G च्या अंतर्गत आपणास  संस्थेची पावती  देण्यात येईल.
    अधिक माहिती साठी संपर्क: ( कार्यकारिणी सभासद) प्रमोद देसाई- 9833588532, रेखा ताम्हाणेकर 9004281610,  सोनी ठाकुर-9870070901, नेहा गोगटे- 9833103186, मुकुंद वढावकर- 9869103708, संजय नागपुरे- 9987735425

वरळीतील दिव्यांग बांधवाना दिवाळी सणानिमित्त टीशर्टचे वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : मुंबई येथील महाराष्ट्रासह गोवा राज्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक सातत्याने कार्यरत असणाऱ्या मुंबई ये...