आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६

जनता हायस्कूल गडब विद्यालयास सौ. करुणा तुरे व श्री. नंदकुमार तुरे यांच्याकडून १४ प्लास्टिक खुर्च्यांची सप्रेम भेट

गडब (अवंतिका म्हात्रे ): येथील नामांकित शिक्षण संस्था जनता हायस्कूल गडब विद्यालयास खारपाले येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. करुणा तुरे (मॅडम) तसेच त्यांचे चिरंजीव श्री. नंदकुमार तुरे (दुबई) यांच्या वतीने १४ प्लास्टिक खुर्च्या सप्रेम भेट देण्यात आल्या. या उपयुक्त वस्तूभेटीमुळे विद्यालयाची बैठक व्यवस्थेची महत्त्वाची गरज पूर्ण झाली आहे.
        सौ. करुणा तुरे या मुंबईत विविध सामाजिक कार्यांत सातत्याने सक्रिय असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नियमित पुढाकार असतो. विशेष म्हणजे, त्या जनता हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी आपल्या शाळेप्रती दाखवलेल्या या कृतज्ञतेचे व स्नेहाचे गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सामाजिक दातृत्वाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, श्री. एस. के. पाटील सर, श्री. पांडे सर, श्री. मांडवे सर, श्री. नेवरे सर, सौ. आर. आर. पाटील मॅडम, सौ. घरात मॅडम, श्री. चौधरी सर, श्री. शेळके सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तुरे कुटुंबीयांचे आभार मानले.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोटे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई - सामाजिक क्षेत्रात अहोरात्र कार्य करणारे, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे, तथा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई विभागाचे अध्यक्ष - सुरेश पोटे यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
    साप्ताहिक ‘भगवे वादळ’ च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन साप्ताहिकचे संपादक - दत्ता श्रावण खंदारे यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
       सुरेश पोटे हे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क, आरोग्य आणि सन्मानासाठी कार्यरत आहेत. फेस्कॉमच्या माध्यमातून त्यांनी मुंबई, नवी मुंबई विभागात ज्येष्ठ नागरिकांना संघटित करून त्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातूनही त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
त्यांच्या या समाजसेवेचा गौरव म्हणून यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा *‘समाजभूषण’* सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.
............

ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ येथे आदिशक्तीचा जागर ; भोंडला, गरब्याच्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा!

नवी मुंबई : सुभाष हांडे देशमुख  नेरुळ : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ च्या भव्य श्री गणेश सभागृहात गुरुवार, दिनांक १५ ऑक...