गडब (अवंतिका म्हात्रे ): येथील नामांकित शिक्षण संस्था जनता हायस्कूल गडब विद्यालयास खारपाले येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. करुणा तुरे (मॅडम) तसेच त्यांचे चिरंजीव श्री. नंदकुमार तुरे (दुबई) यांच्या वतीने १४ प्लास्टिक खुर्च्या सप्रेम भेट देण्यात आल्या. या उपयुक्त वस्तूभेटीमुळे विद्यालयाची बैठक व्यवस्थेची महत्त्वाची गरज पूर्ण झाली आहे.
सौ. करुणा तुरे या मुंबईत विविध सामाजिक कार्यांत सातत्याने सक्रिय असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नियमित पुढाकार असतो. विशेष म्हणजे, त्या जनता हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी आपल्या शाळेप्रती दाखवलेल्या या कृतज्ञतेचे व स्नेहाचे गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सामाजिक दातृत्वाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, श्री. एस. के. पाटील सर, श्री. पांडे सर, श्री. मांडवे सर, श्री. नेवरे सर, सौ. आर. आर. पाटील मॅडम, सौ. घरात मॅडम, श्री. चौधरी सर, श्री. शेळके सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तुरे कुटुंबीयांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा