नेरुळ : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ च्या भव्य श्री गणेश सभागृहात गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक संघातील महिलांनी एकत्र येत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने आदिशक्ती, आदिमातेचे पूजन व आरती करून भक्तिमय वातावरणात देवीचा जागर करण्यात आला. अगदी वय वर्ष सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहाने या पारंपरिक अशा सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सक्रिय भाग घेत हा कार्यक्रम साजरा केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव म्हणजे सर्जनशीलतेचा गौरव आणि नवनिर्मितीला केलेले वंदन होय. या भावनेतून संघातील ज्येष्ठ महिला सदस्यांनीच ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक भोंडला आणि गरबा खेळण्याचा आनंद ज्येष्ठ नागरिकांनी लुटला. महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्ती, आनंद आणि उत्साहाने भारावून टाकला. संघातील ज्येष्ठ महिलांनी करा ओके च्या माध्यमातून ऊस्फूर्तपणे गाणी गाऊन कार्यक्रम अधिक अधोरेखित केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वाती गावडे, रंजना जोशी, रजनी कलोसे, निर्मला शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संघाचे अध्यक्ष विकास साठे आणि त्यांचे कार्यकारी मंडळ यांनी या कार्यक्रमास आवश्यक लागेल ती मदत उपलब्ध करुन देऊन कार्यक्रम अधिक सशक्त करण्यास मदत केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपाहार देण्यात आला. राष्ट्रगीताने या मंगलमय कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा