आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

संगीतमय कार्यक्रम -"मेरी जान तिरंगा है" व सन्मान सोहळा संपन्न

पनवेल : ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टी.एम.जी.क्रिएशन आयोजित देशभक्तीपर गीतांचा ' मेरी जान तिरंगा है हमारा' हा बहारदार कार्यक्रम व सन्मान सोहळा रोटरी कम्युनिटी हॉल, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील हिंदी व मराठी चित्रपटामधील राष्ट्रभक्तीपर गीते ७ते७०वर्षे वयोगटातील गायकांनी सादर केली.सदरहु संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना एन.डी.खान यांची होती.
     अँड सुरेखा भुजबळ, अशोक डिका, डॉ. विजय मोरे,विद्या डोंबे, सुनिल दळवी,मिलिंद जाधव, सुरेश लहुळकर, राजकुमार सावंत, श्वेताम्बरा करबाटे,,दीपक कदम, अनिल शिशुपाल, सुनीता भुजबळ, कु.अर्णव झोडगे, कुमारी पार्थी घरत, कुमारी सावनी पाटील, मिलिंद पराटे, इत्यादी गायकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गाऊन श्रोत्यांचे कान तृप्त केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक एन.डी.खान यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी नेहमीच्या सफाईने केले.प्रसंगानुरूप दर्जेदार काव्यपंक्ती त्यांनी सादर केल्या.
     कॅप्टन मनोज भांबरे, ॲड.जीविता पाटील, विलास खानोलकर ,सि.के.टी चे डॉ . राजेश येवले, प्रल्हाद तळेले,.हाजी शाहनवाज खान,अभिनेत्री उर्मिला डांगे, सिने कलाकार सुरज कांबळे, अनुप बहाड , सौरभ पवार,साहित्यिक ऋता भांबरे, विजय भोसले, भगवान बडगुजर, रोशन शेख , शैलेंद्र अक्कलकोटे , वनिता कोळी आणि छाया अक्कलकोटे 
इत्यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमात पनवेल परिसरातील २५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी नाजनिन पालेकर, रेश्मा मुलये, पूनम गुप्ता, मंजूषा कदम,सुधा वाटवे, मनिषा वाटवे गीता देवरीया हे आपल्या शालेय शिक्षकां सोशल उपस्थित होते.
     कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्व गायकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.सलमा खान , डॉ .विजय मोरे श्री.राजकुमार ताकमोगे सौ.मीना ताकमोगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कनकिया सिलिकॉन व्हॅली शाखेची स्वाभिमान भारत कपमध्ये शानदार कामगिरी

मुंबई(शांताराम गुडेकर ) कनकिया सिलिकॉन व्हॅली (KSV) शाखेच्या कराटेपटूंनी प्रियदर्शी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड येथे झालेल्या २०व्या स्वाभिमान भारत कप – ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाखेचा गौरव वाढवला.
       या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत KSV शाखेच्या ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत १३ पदकांची कमाई केली, ज्यामध्ये ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि मेहनतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आपल्या कामगिरीची छाप उमटवली.
         या शानदार कामगिरीसोबतच सिनियर कोच सेन्सी रितिका भोसले यांना ‘बेस्ट कोच ऑफ द इयर २०२६’ या मानाचा पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची पावती आहे.या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य आणि संघभावना महत्त्वाची ठरली. हेड कोच रेन्शी फ्राझ शेख, सिनियर कोच सेन्सी रितिका भोसले आणि सेन्सी आशिष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेतले.
       ७ विद्यार्थ्यांनी १३ पदकांसह केलेली ही शानदार कामगिरी आणि सेन्सी रितिका भोसले यांना मिळालेला ‘बेस्ट कोच ऑफ द इयर २०२६’ हा सन्मान KSV शाखेसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

नारळ फोडीच्या पारंपरिक खेळातून संस्कृतीचा जागर!

अलिबाग(जगदीश दगडे/दिनेश तुरे )रायगड- अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथे श्री रामनाथ गावदेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक नारळ फोडी...