आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

नारळ फोडीच्या पारंपरिक खेळातून संस्कृतीचा जागर!

अलिबाग(जगदीश दगडे/दिनेश तुरे )रायगड- अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथे श्री रामनाथ गावदेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक नारळ फोडीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भाजपा रामनाथ विभागप्रमुख अजिंक्य शेवडे तसेच शगीर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       या पारंपरिक स्पर्धेला नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. मोबाईल, सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात आपल्या मातीतले पारंपरिक खेळ, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या स्थानिक परंपरा आणि खेळांची ओळख होण्यास मदत होते.
यावेळी नगरसेविका संध्या पाळवणकर, भाजपा महिला प्रमुख पल्लवी जोशी, अलिबाग शहर सचिव मानस कुंटे, निखिल चव्हाण, सुनील दामले, अशोक वारगे, आदित्य जैन, मयुरेश जोशी, श्री गाडे,पुनीत शेठ, रोशन भगत यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
       विशेष म्हणजे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.आमदार प्रमोद जठार यांच्यासोबत नारळ फोडीच्या खेळात सहभागी होण्याची संधी ॲड. अंकित बंगेरा यांना मिळाली. हा क्षण आनंददायी आणि अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.
      परंपरा जपूया, स्थानिक खेळांना प्रोत्साहन देऊया आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडूया, असे आवाहन ॲड. अंकित बंगेरा यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नारळ फोडीच्या पारंपरिक खेळातून संस्कृतीचा जागर!

अलिबाग(जगदीश दगडे/दिनेश तुरे )रायगड- अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथे श्री रामनाथ गावदेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक नारळ फोडी...