पनवेल नेरे येथील रहिवासी नारायण बुधाजी पाटील यांचे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ९८ वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. तेअतिशय मनमिळावू स्वभावाचे होते . गावामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता; त्यांच्या स्वभावाची गावात एक वेगळीच छाप होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील तसेच पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ०१ डिसेंबर २०२६ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार असून, उत्तरकार्य (तेरावे) बुधवार, दि. ०२ डिसेंबर २०२६ रोजी राहत्या घरी नेरे येथे पार पडणार आहे. यानिमित्त खालीलप्रमाणे भजन, हरिपाठ आणि अभंगवाणीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ (रात्री ८ वा.): हनुमान प्रासादिक भजन मंडळ (बुर्दुळ) यांचा भजनाचा कार्यक्रम होईल (बुवा: श्री. अमोल पाटील, श्री. बाळाराम पाटील; मृदंगमणी: श्री. नितेश पाटील; कोरस: चेतन पाटील, अजय पाटील).
* सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ (सायं. ६ वा.): विठ्ठल रुक्मिणी महिला हरिपाठ मंडळ, विहिघर यांचा हरिपाठ होईल. त्यानंतर रात्री ८ वा. राधा कृष्ण बालगोपाल भजन मंडळ हरिग्राम-पनवेल यांचे भजन होईल (गायिका: संगीत विशारद कु. प्रतिज्ञा सुरेश पाटील, संगीत विशारद कु. तपस्या हनुमान पाटील; कोरस: कु. प्रज्ञा, आर्या; पखवाज: संगीत विशारद ॲड. कु. प्रसाद सुरेश पाटील; चखवा वादक: श्री. अरुण जोशी; चालक: श्री. गजानन नथु पाटील, श्री. हनुमान नथु पाटील).
* मंगळवार, दि. ०१ डिसेंबर २०२६ (रात्री ८ वा.): जय भोलेनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिसार्वे यांचा भजनाचा कार्यक्रम होईल (बुवा: श्री. हरिश्चंद्र पाटील, नाव्हेन; मृदंग: प्रसाद पाटील, बळू पाटील; गायन साथ: रामदास म्हात्रे, कामोठे, गोपीनाथ म्हात्रे).
* बुधवार, दि. ०२ डिसेंबर २०२६ (सकाळी १० ते १२ वा.): शिवशक्ती भजनी मंडळ नवघर, खोपोली (भजन सम्राट शिवाजी बुवा देशमुख यांचे चिरंजीव) यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होईल (गायक: संदीप बुवा देशमुख - रायगड भूषण; सहगायक: अल्केश कर्णूक, श्री. अशोक शिंदे; पखवाज: रोहन पाटील; तबला: योगेश देशमुख).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा