आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शेलवले यांना मातृशोक

वासिंद (हर्षल शेलवले)-वासिंद येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदकुमार रघुनाथ शेलवले यांच्या मातोश्री कै. सरस्वती रघुनाथ शेलवले (वय ७५) यांचे रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेलवले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
   कै. सरस्वती रघुनाथ शेलवले या अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कुटुंबासाठी त्याग आणि मायेची शिकवण दिली. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक मोठा आधार हरपला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
      कै. सरस्वती रघुनाथ शेलवले यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या सुखासाठी वेचले. घरातील प्रत्येकाला मायेची ऊब देणाऱ्या आईच्या रूपात त्या सर्वांना परिचित होत्या. शेजारी पाजारी, नातेवाईक, गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.सर्वांना आपलेसे करणे, हा त्यांचा स्वभाव होता.त्याचं निधन सर्वांच्या मनाला चटका लावून गेल्याची खंत ग्रामस्थ तसेच सर्व नातेवाईक व परिवार व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शेलवले यांना मातृशोक

वासिंद (हर्षल शेलवले)- वासिंद येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदकुमार रघुनाथ शेलवले यांच्या मातोश्री कै. सरस्वती रघुनाथ शेलवले (वय ७५) यांचे...