बुद्धिबळ, एकल नृत्य, समूह नृत्य, कथाकथन, नाट्य अभिवाचन, काव्य वाचन, कराओके गायन, निबंध लेखन, कॅरम, ब्रिज आणि वेशभूषा स्पर्धा. अश्या एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
यंदाच्या निबंध स्पर्धेसाठी 'AI युग - संधी, आव्हाने आणि भविष्य', 'मोबाईल - सोबती की अडचण?' आणि 'आता कुटुंब-प्रमुख कोण - तो का ती?' असे नाविन्यपूर्ण व विचारप्रवर्तक विषय देण्यात आले आहेत.स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क प्रति स्पर्धा ₹१००/- असून फेस्कॉमशी संलग्न संघ / विरंगुळा केंद्राचे सभासदत्व असणे बंधनकारक आहे. सर्व स्पर्धा श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ, करी रोड आणि ज्येष्ठ नागरिक भवन, नेरूळ येथे होणार असून स्पर्धेची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांतील सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे यांनी केले आहे.अधिक माहिती साठी संपर्क - ९३२२४०१९६५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा