आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

शहापूर तालुक्यातील जांभे गावच्या चिन्मय शेलवले या चिमुकल्याची कलात्मक भक्ती ; शेतातील मातीपासून बनवला बाप्पा

वासिंद (हर्षल शेलवले): पर्यावरणाचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील जांभे गावातील एका चिमुकल्याने दिली आहे.
     या गावातील कु.चिन्मय विजय शेलवले या सहावी इयत्तेतेत शिकत असलेल्या मुलाने शेतातील मातीपासून स्वतःच्या हाताने अतिशय सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्ती घरीच साकारली आहे. शेतातल्या मातीतून बाप्पाला आकार देण्याची त्याची कल्पना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
      चिन्मयने बनवलेल्या या इको-फ्रेंडली गणपतीची सजावटही त्याने स्वतःच केली आहे. "श्री गणेशाय नमः" लिहिलेल्या मखरात विराजमान झालेला हा बाप्पा पाहून सर्व स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
       लहान वयात असलेली ही कलात्मकता आणि निसर्गाप्रती असलेली जागरूकता निश्चितच इतर मुलांसाठी प्रेरणादायी आहे. चिमुकल्या चिन्मयच्या या भक्तीला सलाम अश्या असंख्य प्रतिक्रियाही जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनकल्याणाचा सेतू ; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून शासकीय योजना थेट पोहोचणार घराघरात

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे आणि शासकीय यंत्रणांना जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्रिय सहभागाचे आवाहन ठाणे:- भारतीय संस्कृती आणि लोक...