प्रतिनिधी : आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकणारा विद्यार्थी साहिल वाकोडे हा शुक्रवारी सायंकाळी वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
एका महिन्यात दोन आत्महत्या झाल्याने आय.आय.टी प्रशासनाच्या विरोधात सर्वत्र रोष व्यक्त होत आहे आणि निषेध आंदोलन करण्यात येत आहे. त्यात रविवारी भीम आर्मी यांनी निषेध आंदोलन करत आय.आय.टी संकुलाच्या बाहेर ठिय्या मांडून नारेबाजी केली. यावेळी मयत विद्यार्थी याला व यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा हीच प्रमुख मागणी भीम आर्मी यांची आहे.
आय.आय.टी प्रशासन साहिल याला जातीवाचक बोलून त्याचे खच्चीकरण करत करत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला, तर प्रशासकडून वेगळीच माहिती समोर येत आहे की संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करताना आढळला होता. त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.परंतु भीम आर्मी न्यायासाठी लढा देत राहिल आणि न्याय मिळवून देऊ असे भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा