आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर, रुबी ज्युबिली वर्ष – ४० गौरवशाली वर्षांची सेवायात्रा !‘नेशन बिल्डर्स अवॉर्ड’ सोहळा उत्साहात संपन्न!!

२९ शिक्षक व मुख्याध्यापकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान
मुंबई(प्रतिनिधी ): रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरच्या ४० व्या रुबी ज्युबिली वर्षानिमित्त, विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि दिशा देत समाज व राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘नेशन बिल्डर्स अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
     या कार्यक्रमात विविध शाळा व महाविद्यालयांतील २९ शिक्षक व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.CSIR चे शास्त्रज्ञ श्री. प्रभाकर इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला १९ रोटेरियन व मान्यवरांसह एकूण ६० जणांची उपस्थिती लाभली.
      या उपक्रमाचे प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन संतोष शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वयातून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लब ट्रेनर रोटेरियन हर्षव दवावाला, रोटेरियन हितेश मेहता, रोटेरियन प्रिया कामठे, रोटेरियन विक्रम दवावाला, PE रोटेरियन चेतना मेहता, रोटेरियन टिला पटेल, रोटेरियन अक्षय वैष्णव, रोटेरियन दीपक खेर आणि क्लब सेक्रेटरी रोटेरियन पूजा स्थळेकर यांचे विशेष योगदान लाभले.
      तसेच क्लबचे मार्गदर्शक PDG रोटेरियन श्रीरंग प्रभू साहेब यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन व आशीर्वादाबद्दल क्लबतर्फे मनःपूर्वक आभार मानून  मानद रोटेरियन व ज्येष्ठ पत्रकार  दत्ताराम घुगे यांनी या उपक्रमाला प्रसिद्धी देत मोलाचे सहकार्य केले. त्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
      यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष रोटेरियन प्रकाश कामठे यांनी सांगितले, “शिक्षक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पणाचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि कृतज्ञतेची बाब आहे.
    या उपक्रमातून ‘Service Above Self’ या रोटरीच्या सेवाभावनेचा सुंदर प्रत्यय आला.
शिक्षक घडवतात विद्यार्थी, विद्यार्थी घडवतात समाज आणि समाज घडवतो राष्ट्र !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कंत्राटी कामगारांवर अन्याय!!

मुंबई आणि उपनगरा मध्ये मुंबई महानगरपालिकेने घनकचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी घनकचरा विभागाच्या ताब्यात नवीन वाहनांची स...