आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

वाशी येथे ८४०० रुपयांचा गांजा जप्त; ८१ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

गडब / अवंतिका म्हात्रे
वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी सरपाटळ आळी येथे पोलिसांनी कारवाई करून ८४०० रुपये किमतीचा १६८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी ८१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास वाशी सरपाटळ आळी, ता. पेण येथे आरोपी भाऊ नारायण म्हात्रे (वय ८१, रा. वाशी सरपाटळ आळी, ता. पेण, जि. रायगड) यांच्या राहत्या घरात ही कारवाई करण्यात आली.
     कारवाईदरम्यान पोलिसांना काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले व फळे असलेला, उग्र वास येणारा वनस्पतीजन्य पदार्थ आढळून आला. तपासणीअंती तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण १६८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ८४०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
    याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२६ नुसार गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) II (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    या प्रकरणाचा पुढील तपास वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, वडखळ पोलीस ठाणे, करीत आहेत. फिर्याद रामनाथ मोरेश्वर ठाकूर (वय ३६, वडखळ पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कंत्राटी कामगारांवर अन्याय!!

मुंबई आणि उपनगरा मध्ये मुंबई महानगरपालिकेने घनकचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी घनकचरा विभागाच्या ताब्यात नवीन वाहनांची स...