मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम ) मुंबईचे अध्यक्ष - सुरेश पोटे यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांची राष्ट्रवादी कार्यालय, मुंबई येथे नुकतीच सदिच्छा भेट घेतली.भेटी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पूर्ववत सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी उपमुख्य मंत्री सुनेत्राताई पवार यांनी सर्व मागण्या गांभीर्याने समजून घेतल्या व ज्येष्ठाच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न संसदेत व संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी फेस्कॉम मुंबई अध्यक्ष - सुरेश पोटे, उपाध्यक्षा - डॉ. रेखा भातखंडे, सदस्य - संजय साने आणि सदस्य - उज्ज्वल पाठारे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा