मुंबई ( प्रतिनिधी) : शिवसेना पुरस्कृत आणि शिवसेना नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा भाऊ ग्रुपचे मार्गदर्शक ज्ञानदेव हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण भाऊ लांडगे मित्रपरिवार आयोजित " शिक्षक सन्मान दहीहंडी 2026 " चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या दहीहंडीचे विशेष म्हणजे ही शिक्षक दिनी आल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना सलाम करणारी आणि समर्पित असणारी ठरणार आहे. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गोविंदा पथकांसाठी रुपये 11 लाख 11 हजार 316 रुपयांचे भव्य पारितोषिकही ठेवण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांनी केले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत दहीहंडी कार्यक्रमास निमंत्रित विविध विभागातील शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे निमंत्रक ज्ञानदेव हांडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा